|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्व टी-20 स्पर्धेचे नवे नामकरण

विश्व टी-20 स्पर्धेचे नवे नामकरण 

वृत्तसंस्था/ दुबई

सध्या होत असलेल्या विश्व टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या नावात फेरबदल करण्यात आला असून आता यापुढे ही स्पर्धा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाईल, असा खुलासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी)ने केला आहे. 2020 च्या ‘विश्व टी-20’ स्पर्धेला आता ‘टी-20 विश्वचषक’ या नावाने संबोधले जाईल.

शुक्रवारी आयसीसीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेटमधील कसोटी, वनडे आणि टी-20 या प्रकारातील होणाऱया विश्व स्पर्धेमध्ये हेच नवे नामकरण अमलात आणले जाईल, असे आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. आयसीसीच्या सदस्यांनी या प्रस्तावाला आपली मान्यता दिली आहे. आयसीसीचे एकूण 104 सदस्य आहेत. आयसीसीच्या आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकामध्ये 50 षटकांच्या स्पर्धेला आता विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखले जाईल. तसेच पुढील वर्षी विश्व कसोटी स्पर्धा घेतली जाणार आहे.