|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणात क्रिकेटसाठी स्पर्धात्मक वातावरणाची गरज

कोकणात क्रिकेटसाठी स्पर्धात्मक वातावरणाची गरज 

वार्ताहर  /दाभोळ :

कोकणातील क्रिकेटमध्ये स्पर्धात्मक वातावरण नाही. शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटला व्यासपीठ नाही. त्यामुळे येथील खेळाडूंना पुढे जाण्याची संधीच मिळत नाही, अशी खंत भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली. तसेच वणौशीतील श्रीकांचन बाग क्रीडासंकुल कोकणासाठी एक आशेचा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

  दापोली तालुक्यातील वणौशी येथील श्रीकांचन क्रीडा संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील वणौशीसारख्या छोटय़ा गावात श्रीकांत बापट यांनी आपला हा महत्वाकांक्षी उपक्रम सर्वांसाठी खुला केला आहे. यावेळी बापट समूहाच्या मित्र परिवारांबरोबरच स्थानिक लोकांचीही मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. 

 याप्रसंगी दिलीप वेंगसरकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर, श्रीकांत बापट यांचा सत्कार करण्यात आला. टेनिस कोर्टचे कुमार केतकर, क्रिकेट मैदानाचे वेंगसरकर, गोल्फ शुटींग रेंजचे ठाणे मॅन्युपॅक्चरर असोसिएशनचे चेअरमन बी. के. राणे, व्हॉलीबॉल मैदानाचे दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

  यावेळी लॅब इंडियाचे संचालक व्ही. एस. उपाध्ये, कांचन बापट, माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी, ऍथलेटिक कोच अजित कुलकर्णी, वणौशी सरपंच प्रकाश तेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक प्रभू, तर आभार प्रदर्शन वयम् मासिकाच्या संपादिका शुभदा चौकर यांनी केले. 

Related posts: