|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » सरकार मराठा आरक्षण विधेयक 28 नोव्हेंबरला विधानसभेत मांडणार

सरकार मराठा आरक्षण विधेयक 28 नोव्हेंबरला विधानसभेत मांडणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विधानसभेत मांडणार आहे. तर गुरुवारी 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज सकाळी पार पडली. या बैठकीत विधेयकाचे प्रारुप ठरवण्याबाबत चर्चा झाली. आज संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्मयता आहे. तर, आरक्षणाच्या अहवालावर बुधवारी, गुरुवारी चर्चा करु, असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारल्यानंतर तो तातडीने सभागृहात मांडा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून यावरुन विरोधकांचा गदारोळ सुरु आहे.