|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्यात ठिकठिकाणी संविधान दिन उत्साहात

जिह्यात ठिकठिकाणी संविधान दिन उत्साहात 

प्रतिनिधी/ सातारा

संविधान दिनानिमित्ताने साताऱयात शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करुन सामुदायिक पद्धतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाचे पूजन ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थितांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी महिला सेलने तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

संविधान दिनानिमित्ताने शाहू चौकात रिपाइंच्या ब्ल्यू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, बाबा ओव्हाळ, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या फोटोची प्रतिमा वाटप करण्यात आली. सामुदायिक संविधानाचे वाचनही करण्यात आले. तसेच विविध शासकीय कार्यालयात संविधान दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निवेदन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान हाच देशाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाला वाचवा असा मचकूर असलेले पत्रच राज्यपालांना लिहिले आहे. ते पत्र तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना निवेदन देताना राष्ट्रवादी महिला जिल्हा कार्याध्यक्षा जयश्री पाटील, तालुकाध्यक्षा कविता मेणकर, उपाध्यक्ष उषाताई जाधव, नंदिनी जगताप, वनिता कण्हेरकर, गौरी शेट्टे, संगीता देशमुख आदींसह राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.