|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव 

पुणे / प्रतिनिधी :

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील पक्ष कार्यालयात गुरुवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सरचिटणीस उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यासह मोठय़ा संख्येने पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. गोगावले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे. जातीय राजकारण करणाऱया पक्षांनी या निर्णयाने योग्य तो धडा घेतला असेल. विकासाचे समाजकारण करणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय करणाऱया राज्याच्या मंत्रिमंडळाचे या वेळी अभिनंदन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचनही करण्यात आले. तसेच उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.