|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयटी पार्क प्रकल्प उभारताना पर्यावरणाला हानी होणार नाही

आयटी पार्क प्रकल्प उभारताना पर्यावरणाला हानी होणार नाही 

प्रतिनिधी /पणजी :

चिंबल येथे होणाऱया आयटी पार्क या प्रकल्पासाठी सल्लागार समितीची नेमणूक वपे असून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होऊ न देता हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. चिंबल तळ्यापासून दूर हा प्रकल्प असल्याने तळ्याचे पाणी दुषीत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे लोक यासाठी विरोध करतात त्यांनी पहिल्यांदा प्रकल्प जाणून घ्यावा व नंतरच यावर बोलावे. प्रकल्प उभारणीसाठी स्थानिक आमदार आणि पंचायतीशी बोलणी झाल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री खंवटे यांनी सांगितले की, 130 एकरची ही जागा असून केवळ 10 ते 12 एकरमध्येच हा पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठय़ाप्रमाणात कमी होईल. 6000 हजारहुन अधिक मुलांना रोजगार मिळणार आहे. सदर प्रकल्प उभारल्यावर नोकरीसाठी प्रथम प्राधान्य स्थानिकांना देण्यात येईल तसेच अनुसूचित जातींनादेखील नोकऱया मिळवून देईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

जे लोक यासाठी विरोध करतात त्यांना हा प्रकल्प म्हणजे काय हे माहीत नाही. एवढेच नाही तर त्यांना त्या प्रकल्पाविषयी जाणून घेण्याची इच्छाही दिसून येत नाही. ज्यांना हे जाणून घ्यावेसे वाटते त्यांच्यासाठी दारे खूली आहेत तर ज्यांना केवळ विरोधच करायचा असेल त्यांना आमची दारे खुली नसल्याचेही ते म्हणाले. ज्यावेळी याच ठिकाणी बाहेरील राज्यातील लोकांनी जागा घेऊन ईमारती बेधल्या त्यांना या लोकांनी विरोध केला नाही पण ज्यावेळी सरकार विकासासाठी काहीतरी करू पाहत आहे तर त्याला विरोध का असा प्रश्नही त्यांनी उप†िसत केला.