|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा ; 864गुन्हे मागे घेणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा ; 864गुन्हे मागे घेणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भीमा कोरेगाव व मराठा मोर्चा यावेळी विविध गुह्यांसाठी एक हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले होते. मात्र, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे वगळता अन्य शेकडो गुन्हे मागे घेतले जातील असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधनसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चा व भीमा कोरेगाव प्रकरणी झालेला हिंसाचार यामध्ये हजारो तरूणांना निष्कारण गोवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच अनेक तरूणांचे भवितव्य यामुळे धोक्मयात येऊ शकतं अशी भीती व्यक्त करत हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देताना या संदर्भातली संपूर्ण आकडेवारीच आज जाहीर केली व शेकडो गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचे घोषित केले.

मराठा मोर्चा दरम्यानचे गुन्हेः

एकूण गुन्हे दाखल – 543

गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – 46

गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – 66

आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे- 117

चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – 314

भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे :

एकूण दाखल गुन्हे – 655

गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – 63

गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – 159

आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – 275

चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – 158

 

Related posts: