|Sunday, June 16, 2019
You are here: Home » विविधा » राज्यात 1 जानेवारी 2019पासून सातवा वेतन आयोग लागू होणार

राज्यात 1 जानेवारी 2019पासून सातवा वेतन आयोग लागू होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकारी कर्मचाऱयांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधनपरिषदेत ही माहिती दिली.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होते. त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.