|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 180 किमी प्रतितासाच्या वेगाने धावली टी-18

180 किमी प्रतितासाच्या वेगाने धावली टी-18 

नवी दिल्ली

 भारतीय रेल्वेच्या पहिला इंजिनरहित रेल्वेने वेगाप्रकरणी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेन-18 चाचणीदरम्यान 180 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाहून अधिक वेगाने धावल्याने ही देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे ठरली आहे. या रेल्वेचा कमाल वेग 220 किमी प्रतितासापर्यंत राहू शकतो.

यापूर्वी भारतीय रेल्वेमार्गावर टॅल्गो ट्रेन 180 किमीच्या वेगाने धावली असली तरीही ती स्पेनची ट्रेन होती. सद्यकाळात भारताची सर्वात वेगवान रेल्वे गतिमान एक्स्प्रेस दिल्ली ते झाशीदरम्यान कमाल 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने अंतर कापते.

नेक्स्ट जनरेनशची ट्रेन असा उल्लेख होणाऱया ट्रेन-18 ची चाचणी दिल्ली-मुंबई राजधानी मार्गावर घेतली जात आहे. शनिवारी चाचणीदरम्यान या रेल्वेने 170 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठला तर रविवारी या रेल्वेने नवा विक्रम नेंदविला आहे. अत्याधिक वेगात देखील रेल्वेत झटके बसले नाहीत असे म्हणत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एक चित्रफित शेअर केली आहे. यात पाण्याची बाटली दिसत असून ती अत्यंत स्थिर आहे.

चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेल्या या रेल्वेला कोणत्याही इंजिनची गरज भासत नाही. याच्या पहिल्या डब्यात ड्रायव्हिंग यंत्रणा असून त्यात देखील 44 आसने आहेत. रेल्वे पूर्णपणे संगणकीकृत असून बुलेट ट्रेन प्रारुपाच्या धर्तीवर याची निर्मिती करण्यात आली आहे. याच्या निर्मितीकरता सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

Related posts: