|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कोणत्याही देशाने नेपाळला गृहीत धरू नये!

कोणत्याही देशाने नेपाळला गृहीत धरू नये! 

काठमांडू

 नेपाळ आणि चीन यांच्यातील दृढ होणाऱया संबंधांचा बचाव करत माजी पंतप्रधान माधवकुमार यांनी आपला देश आत्मसन्मान आणि स्वार्मभौमत्वाच्या आधारावर शेजारी देशांसोबत संबंध बाळगू इच्छित असल्याचे म्हटले आहे. एका शेजारी देशासोबत आमचे संबंध असावेत आणि दुसऱयासोबत नसावेत असे घडू शकत नाही. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध दृढ असून आम्ही या संबंधांमध्ये नव्याने उत्साह निर्माण करण्यासाठी काम करावे लागणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. नेपाळने कधीच भारताच्या विरोधात चीनचा वापर केला नाही तसेच चीनच्या विरोधात भारताचाही वापर केलेला नाही. नेपाळच्या अंतर्गत प्रकरणांचा कोणीही वापर करू नये तसेच आमच्या देशाला कोणी गृहितही धरू नये. भारत एक मोठा शेजारी देश असू ज्याच्यासोबत आमचे जुने भावनात्मक संबंध राहिले आहेत. परंतु सद्यकाळात जागतिक रचनेत व्यापाराला अनन्यसाधारण स्थान असल्याने नेपाळने विकासाच्या दिशेने वाटचाल करावी असे आम्ही इच्छित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.