|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महिंदा राजपक्षे यांना न्यायालयाचा नवा झटका

महिंदा राजपक्षे यांना न्यायालयाचा नवा झटका 

कोलंबो

 श्रीलंकेच्या एका न्यायालयाने सोमवारी महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास मज्जाव केला आहे. न्यायालयाचा हा आदेश राष्ट्रपती मैत्रिपाल सीरिसेना यांच्यासाठी मोठा झटका असून त्यांनीच रानिल विक्रमसिंघे यांच्याजागी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती.  न्यायालयाने राजपक्षे आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात अंतरिम आदेश देत पंतप्रधान, कॅबिनेट आणि उपमंत्री म्हणून काम करण्यावर बंदी घातली आहे. हा आदेश राजपक्षे आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात 122 खासदारांच्या याचिकेवर देण्यात आला आहे.  राष्ट्रपती सीरिसेना यांनी 26 ऑक्टोबर रोजी विक्रमसिंघे यांना पदच्यूत करत राजपक्षे यांना पंतप्रधानपदी नेमले होते. यानंतर संसदेत बहुमत मिळू शकत नसल्याचे जाणवल्यानंतर सीरिसेना यांनी संसद विसर्जित करत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली होती. तर सर्वोच्च न्यायालयाने मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला स्थगिती देत संसद विसर्जित करण्याचा निर्णय पलटविला आहे.