|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » विद्याधर अनास्कर, मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न पुरस्कार’

विद्याधर अनास्कर, मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न पुरस्कार’ 

पुणे / प्रतिनिधी :

  • लिज्जत पापडचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम 7 व 8 डिसेंबरला

 

श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड या सार्वजनिक संस्थेचा सुवर्णमहोत्सव येत्या 7 आणि 8 डिसेंबरला साजरा होणार आहे. यानिमित्ताने सामाजिक सेवेबद्दल अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीसाठी विद्याधर अनास्कर यांना ‘लिज्जत रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर आणि पुणे शाखेच्या संचालिका सुमन दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

7 डिसेंबरला सकाळी 10 वाजता पुरस्काराचा कार्यक्रम होईल. यावेळी खासदार वंदना चव्हाण, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, युएसके फाऊंडेशनच्या उषा काकडे, अभिनेत्री अनिता दाते उपस्थित राहणार आहेत. मुख्य सोहळा 8 डिसेंबरला होणार असून, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडकेर यांची प्रमुख उपस्थिती याला असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ कृषितज्ञ बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी उपस्थित असणार आहेत. दोन्ही कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होतील.