|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » मिशेल उलगडणार सगळय़ांची गुपिते, मोदींची सोनिया गांधींवर थेट टीका

मिशेल उलगडणार सगळय़ांची गुपिते, मोदींची सोनिया गांधींवर थेट टीका 

ऑनलाईन टीम / सुमेरपूर (राजस्थान) :

राजस्थान विधनसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधन नरेंद्र मोदींनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुमेरपूर येथील प्रचारसभेत अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात प्रत्यार्पण झालेल्या ख्रिश्चियन मिशेल मिशेलचा धगा पकडत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर थेट टीका केली.

 

मोदी म्हणाले, 2014 च्या माझ्या सभांमधील माझ्या भाषणांमध्ये मी हेलिकॉप्टर घोटाळय़ाबाबत उल्लेख केला होता. हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आणि ती चिठ्ठी तुम्हाला माहीत असेलच. मॅडम सोनियाजींची चिठ्ठी आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही कागदपत्रे शोधली. त्याचदरम्यान आज एक माणूस आमच्या हाती लागला. हा हेलिकॉप्टर खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करत होता. भारतातील नामदारांच्या मित्रांची बडदास्त ठेवायचा. आज तुम्ही वाचलंच असेल की भारत सरकारने त्याला दुबई येथून अटक केली आहे. हा दलाल आता अनेक गौप्यस्फोट करणार आहे. कुणास ठावूक हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतेय ते.’’