|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News »   यंदाचे किसान कृषी प्रदर्शन 12 ते 16 डिसेंबरला

  यंदाचे किसान कृषी प्रदर्शन 12 ते 16 डिसेंबरला 

मोशी येथे आयोजन

 पुणे / प्रतिनिधी :

 भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ यंदा येत्या 12 ते 16 डिसेंबर दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती कृषी प्रदर्शनाचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 600 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱयांपर्यंत पोहोचविणे हा किसान प्रदर्शनाचे हेतू आहे. यावेळी  बोलताना कृषी प्रदर्शनाचे संयोजक निरंजन देशपांडे म्हणाले,“या प्रदशर्नाची सुरूवात 1993 मध्ये झाली. गेल्या 28 वर्षांपासून सुरू असलेले हे प्रदर्शन देशातील शेतकऱयांसाठी आयोजित करण्यात आलेले सर्वात मोठे प्रदर्शन आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निवि÷ा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा वाटिका व  शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱया 100 हून अधिक कंपन्यांचा यात सहभाग असेल. भारतीय कृषी अनुसंधन परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

  पुढे बोलताना ते म्हणाले, प्रदर्शनात उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोपमधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. हे दालन प्रदर्शनाचे पहिले 3 दिवस म्हणजे खुले असेल. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा   kisan.net या संकेतस्थळावर व मोबाईल ऍपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शनस्थळी येणाऱया शेतकऱयांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणाऱयांना प्रवेश शुल्कात 50 रुपये सवलत मिळणार आहे.