|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची सुरेश पाटलांची तयारी

न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची सुरेश पाटलांची तयारी 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर महानगरपलिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक  सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाला असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणातील संशयित आरोपींची नावेदेखील पोलिसांना देण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई होत असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात खासगी फिर्याद दाखल करून न्यायालयात दाद मागण्यात येईल अशी माहिती खुद्द सुरेश पाटील यांनीच दिली.

 विशेषत्वे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरेश पाटील यांनी केल्याने  विष प्रयोग प्रकरणाच्या पोलीसांच्या एकूणच तपासावर प्रश्नचिन्ह आले आहे. दरम्यान विष प्रयोगाच्या अनुषंगाने, दवाखान्यात दाखल होवून वर्ष लोटले तरी अद्याप संबंधीतांवर गुन्हे दाखल होत नसल्यामुळे या प्रकरणच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर, पोलीसांवर राजकीय दबाब येत असल्याचा संशय सुरेश पाटील यांना असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात सोलापूरचे पोलीस  आयुक्त महादेव तांबडे यांच्यावर दबाव आणत असल्याचे त्यांनी बुधवारी ‘तरूण भारत संवाद’ कडे बोलूनदेखील दाखवले आहे.

नगरसेवक पाटील हे 5 डिसेंबर 2017 रोजी आजारी असल्याने सोलापूरातील मार्कंडेय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर पुणे आणि मुंबई येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या शरीरामध्ये थेलियम नावाचे विष आढळले असून या निदानामुळे खळबळ माजली होती. नगरसेवक पाटील रुग्णालयात दाखल होऊन वर्ष लोटले असून पोलिसांकडे तक्रार देऊन देखील गुन्हा दाखल करण्यात तांत्रिक अडचणी दाखविल्या जात आहेत. या अनुषंगाने पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी त्यांनी आपण रुग्णालयात दाखल झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्व घडामोडींशी सविस्तर चर्चा केली.

पाटील म्हणाले मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असताना विविध चाचण्या करण्यात आल्या त्यावेळी रक्तामध्ये थेलियम नावाचे विष आढळून आले. मी बेशुध्द अवस्थ्sात असल्याने माझा मुलगा बिपीन यांच्यामार्फत मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर सोलापुरातही चौकशी करण्यात आली. दरम्यान प्रदिर्घ उपचारानंतर मी शुध्दीवर आल्यानंतर आपल्याला काही लोकांनी मारण्याचा कट केला होता असे लक्षात आले. मला मारण्यात काही लोकांचे राजकारण असून जे संशयित आहेत त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत.

 वास्तविक पाहता आपण पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन त्याचदिवशी गुन्हा दाखल करणे अपेक्षीत असताना, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याप्रकरणात महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी,अविनाश महागावकर, अशोक निंबर्गी व नगरसेवक सुनिल कामाटी या पाच जणांची नावे संशयित म्हणून पोलिसांना देण्यात आली आहेत. यासर्व संशयीतांचा जबाब पोलिसांनी घेतला असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

तसे तर  जोडभावी पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी तक्रार आल्यानंतर तातडीने या पाच आरोपींविरुध्द कट रचून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करायला हवा, याप्रकरणाचा छडा लावण्यात यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला व इतर आंदोलनेही झाली. परंतु, पोलिसांना अद्याप घाम पुटलेला नाही. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यामार्फत पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्यावर दबाव येत असून याप्रकरणी पोलिसांनी कायद्यासमोर सर्व समान ही भूमिका पार पाडली पाहिजे. परंतु, पोलीस राजकीय दबावाला बळी पडत असून संबंधित पाच आरोपींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.पो†िलसांनी गुन्हा दाखल न केल्यास आपण न्यायालयात याप्रकरणी खाजगी फिर्याद करणार असून यासाठी मी कायदेशीर सल्ला घेत आहे असेही नगरसेवक पाटील म्हणाले.