|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » पंढरीत सेंट्रल बंकेच्या शाखेस शॉटसर्कीटमुळे आग

पंढरीत सेंट्रल बंकेच्या शाखेस शॉटसर्कीटमुळे आग 

प्रतिनिधी /  पंढरपूर

येथील शहरामध्ये असणाऱया सेंट्रल बंक ऑफ्ढ इंडियाच्या पंढरपूर येथईल शाखेच्या इमारतीस शॉटसर्कीटमुळे मंगळवारी रात्री आग लागली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी जरी झाली नसली तरी बंकेकील तब्बल 5 लाख रूपयांच्या मालमत्तेचे  नुकसान झाले आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, येथील शामीयाना हॉटेलच्या शेजारी असणाऱया सेंट्रल बॅक ऑफ्ढ इंडियाच्या पंढरपूर शाखेच्या तळमजल्यावरील  टेंलरींगच्या दुकानाला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. याच तळमजल्यावरील दुकानाच्या आगीचे लोण वरच्या मजल्यावर असणाऱया सेंट्रल बॅकेच्या शाखेपर्यत येउन पोहोचली. यामध्ये बॅकेतील संगणक, वायरिंग, प्रिटर्स, बायोमेंट्रीक मशिन्स, स्पॅनर, पंखे आदिंचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्णपणे 5 लाख रूपयांचे बॅकेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने नमूद करण्यात आले आहे.

 या आगीबाबत बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक करण सिंग यांनी दिलेल्या फ्ढिर्यादीमध्ये झालेले नुकसान नमूद करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रात्रींच्या वेळी अचानकपणे लागलेली आग ही अग्निशमन दलाच्या मदतीने अटोक्यात आणण्यात आली.