|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेत तृतीयपंथीय करणार काम

इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेत तृतीयपंथीय करणार काम 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

इतिहासात पहिल्यांदाच विधानपरिषदेत तृतियपंथीय काम करणार आहे. तिची ड वर्गामध्ये नियुक्ती झाली होती. मात्र तीला कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले नव्हते. याचबरोबर विधानपरिषदेत काम करण्यास तीला अडचण आली होती. तिने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तृतियपंथीय व्यक्ती विधानपरिषद सभागृहात काम करण्यास कोणतीच अडचण नाही, असा आदेश दिला होता. त्यामुळे आता पहिल्यांदाच बेळगावमध्ये होणाऱया अधिवेशनामध्ये विधानपरिषदेतमध्ये तृतियपंतीय काम करणार आहेत, अशी माहिती विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले.

मोनीषा नामक तृतियपंथी कर्मचारी आता विधानपरिषदमध्ये काम करणार आहे. यामुळे एक वेगळी समानता समाजामध्ये निर्माण होणार आहे. मोनीषा गेल्या काही वर्षांपासून ड वर्ग कर्मचारी म्हणून काम करत होती. तिला कायम स्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले. मात्र विधानपरिषमध्ये काम करण्यास तिला देण्यात आले नव्हते. इतर कार्यालयांमध्ये ती काम करत होती. तिला विधानपरिषदमध्ये ड वर्ग कर्मचारी म्हणून काम करायचे होते. यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

न्यायालयाने मोनीषा हिचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर न्यायालयाने विधानपरिषदमध्ये काम करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे निकालात म्हटले. त्यामुळे आता ती विधानपरिषदमध्ये अधिवेशनादरम्यान काम करणार असल्याचे बसवराज होरट्टी यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषदच्या सचिव महालक्ष्मी यांनीही मोनीषा बद्दलची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर, अधिवेशनानिमित्त नियुक्त करण्यात आलेले विशेष अधिकारी उज्वलकुमार घोष, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी,  पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर., पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आदी अधिकारी उपस्थित होते.