|Friday, February 22, 2019
You are here: Home » leadingnews » महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर

महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथे अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून अनुयायी दाखल झाले आहेत. समता सैनिक दलाने पथसंचलंन करुन मध्यरात्री 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. तर, समता सैनिक दलाचे साडे पाच हजाराहून जास्त स्वयंसेवक, तसंच पोलीस इथे तैनात आहेत.

दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. लाखेंच्या संख्येने येणाऱया अनियायींना  सोयीसाठी मुंबई महापालिकेने अनेक सुविधा पुरवल्या आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी आदल्या दिवशीच मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना वास्तव्याची आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याशिवाय महापालिकेच्या सात शाळांमध्येही त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी शिवाजी पार्क इथे येत आहेत. यासाठी मोठी गर्दी पाहता पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 2000 पोलीस सर्व ठिकाणी तैनात आहेत. येणाऱया अनुयायींसाठी योग्य सुविधा पुरवली जाणार आहे. तसेच मदत लागली तर पोलीस कर्मचाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी केली आहे.

Related posts: