|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » युपीए सरकारकडून कोणतीही लाच घेतली नाही : मिशेल

युपीए सरकारकडून कोणतीही लाच घेतली नाही : मिशेल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली घेतल्याचा आरोप असलेला ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलनं पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र ही रक्कम लाच म्हणून नव्हे, तर सल्लागार शुल्क म्हणून स्वीकारल्याचा दावा त्यानं केला आहे. यूपीएमधील मंत्री किंवा संरक्षण मंत्रालयाकडून पैसे घेतल्याचा आरोप मिशेलनं पूर्णपणे फेटाळला आहे.

यूपीए सरकारकडून कोणतीही लाच घेतली नाही. मात्र अगुस्टा वेस्टलँडकडून सल्लागार शुल्क घेतले, अशी माहिती मिशेलनं सीबीआयच्या अधिकाऱयांना दिली.अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप मिशेलवर आहे. मात्र त्याने चौकशीत लाच देणाऱया कोणत्याही व्यक्तीचे नाव सांगितलेले नाही, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. नेत्यांना आणि नोकरशहांना लाच दिल्याच्या प्रकरणात गाइडो हाशके नावाच्या एका युरोपीय दलालानं नोट्स लिहिल्याची माहिती त्यानं दिली. ’व्हीव्हीआयपी चॅपर डिलमध्ये सोनिया गांधी मुख्य आहेत. त्यामुळे भारतात अगुस्टा वेस्टलँडचे सेल्समन पीटर हुलेट यांनी सोनिया गांधी यांच्यानंतर पंतप्रधन मनमोहन सिंग, तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी आणि सोनिया यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना टार्गेट करायला हवं,’ असा उल्लेख त्या नोट्समध्ये होता, अशी माहिती त्या नोट्समध्ये असल्याचं मिशेलने अधिकाऱयांना दिली.

 

हाशकेने या प्रकरणात आपल्याला फसवल्याचा आरोपदेखील मिशेलने केला. या प्रकरणातील ’बजेट खर्च’ नावाखाली तयार करण्यात आलेल्या नोट्सची माहितीदेखील त्यानं दिली. ’काही लोकांना एकूण 30 मिलियन युरोची लाच देण्यात आली होती. या व्यक्तींच्या नावातील काही अक्षरे या नोट्समध्ये होती. FAM, AP अशा सांकेतिक शब्दांसोबत POL असे शीर्षक लिहिण्यात आलं होतं,’ अशी माहिती मिशेलनं तपास अधिकाऱयांना दिली आहे.