|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी लढा उभारणार

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी लढा उभारणार 

प्रतिनिधी  / कोल्हापूर :

  काँग्रेस आघडी सरकारच्या काळात शाहू मिलच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणती कार्यवाही झालेली नाही. यासाठी लढा उभारणार असून शाहू मिल पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार सकल मराठा मावळा गुपने केला.

 आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या लढय़ाला पाठबळ दिल्याबाबत त्यांची सकल मराठा मावळा ग्रुपतर्फे न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. तसेच त्यांचा कोल्हापुरी पद्धतीने सत्कार केला. मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

  प्रलंबित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला. तसेच मिल पुन्हा सुरु करुन नागरिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर शाहू महाराज यांनी शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सकल मराठा मावळा ग्रुपच्या आंदोलनाला पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

 यावेळी सकल मराठा मावळा गुपचे उमेश पोवार, आशितोष खराडे, ऋषिकेश पाटील, समीर पाटील, सुधीर पोवार, उमेश पोवार, केदार माळी, सुहास पवार, अनिकेत पाटील, सुहास साळोखे, अभिजीत साळोखे, प्रशांत जांभळे, संतोष शर्मा, संदीप कोरगांवकर,  नंदन मोरे, निलेश चव्हाण, रणजीत चव्हाण, स्वप्निल साळोखे, दिलीप नलवडे, राजू वर्णे, पवन सुतार, अमोल गायकवाड, श्रीनिवास नारींगकर, रवी कापडे आदी उपस्थित होते.