|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दुष्काळ निवारणात हयगय करणाऱया अधिकाऱयांची गय नाही

दुष्काळ निवारणात हयगय करणाऱया अधिकाऱयांची गय नाही 

प्रतिनिधी / कोल्हापूर :

जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त जनतेला सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्यात. दुष्काळनिवारणाच्या कामात हयगय, टाळाटाळ करणाऱया अधिकाऱयांची गय केली जाणार नाही, अशा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी दिला.

हातकणंगले तालुक्यातील दुष्काळी स्थिता, विविध विकासकामांची आढावा बेठक हातकणंगले येथील तालुका पंचायत समिती कार्यालयात झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला तालुका पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, महिला व बालविकास सभापती वंदना मगदुम, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, तहसिलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी धरणगुत्तीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरेंसह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त गांवात उपाययोजनांचा आराखडा तयार करा

राज्यमंत्री खोत म्हणाले, तालुक्यातील 62 गांवामध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाली आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजना युध्दपातळीवर सुरु कराव्यात. या 62 गावांत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने ग्रामसभा बोलवा. गावातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा संर्वकष कृती आराखडा तयार करा. महसूल, ग्रामीण विकास यंत्रणा, पाणीपुरवठा, रोजगार हमी  अशा सर्व विभागाच्या अधिकाऱ यांनी समन्वय ठेवून दुष्काळी स्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करावा, अशी सुचना मंत्री खोत यांनी केली.