|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » ‘सवाई’अंतर्गत ‘षड्ज’,‘अंतरंग’ कार्यक्रमांचे आयोजन

‘सवाई’अंतर्गत ‘षड्ज’,‘अंतरंग’ कार्यक्रमांचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी :

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चाच एक महत्त्वाचा भाग असलेला ‘षड्ज’ हा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधरित चित्रमहोत्सव तसेच ‘अंतरंग’ हा ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम येत्या 12 ते 14 डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पहिल्या दिवशी ‘षड्ज’ अंतर्गत दिग्दर्शक एस. बी. नयमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ हा लघुपट दाखविण्यात येईल. यानंतर ‘पं. बिरजू महाराज’ हा चिदानंद दासगुप्ता दिग्दर्शित लघुपट पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. यानंतर ‘अंतरंग’ मध्ये यावषी दिवंगत सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचे शिष्य व सरोदवादक पं. बसंत काब्रा यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱया दिवशी ‘षड्ज’ अंतर्गत बिजॉय चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला गिरीजा देवी यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. यानंतर ‘अंतरंग’ या कार्यक्रमात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुलाखत होणार आहे. तिसऱया दिवशीच्या ‘षड्ज’ मध्ये ‘जमुना के तीर’ हा अब्दुल करीम खान यांच्यावरील लघुपट दाखविला जाणार आहे. त्यानंतर आग्रा जयपूर घराण्याच्या गायिका देवकी पंडित यांची मुलाखत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान दिल्याबद्दल ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ यावषी ज्ये÷ गायक पं. उल्हास कशाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.