|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » विनापरवाना दारूवर छापा ; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना दारूवर छापा ; 16 लाखाचा मुद्देमाल जप्त 

ऑनलाईन टीम / नगर :

महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल 16 लाख 75 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पारनेर तालुक्मयातील पुणेवाडी शिवारात, नगर तालुक्मयातील कामरगाव शिवार, बीड जिह्यातील आष्टी तालुक्मयातील कारखेल शिवार अशा तीन ठिकाणी सापळे रचून कारवाई केली. दारुची वाहतूक करणाऱया वाहनांचा पाठलाग करत छापा टाकला. या कारवाईमध्ये भागचंद कोडिंबा सोनवणे, मेघराज रामचंद्र बानिया, भीमराव उत्तम घुले यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून विदेशी दारुच्या 1 हजार 119 बाटल्या जप्त केल्या. तसेच तीन चारचाकी वाहनेही जप्त केली. एकूण 75 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Related posts: