|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाआघाडी जनारेड्डींवर अवलंबून

महाआघाडी जनारेड्डींवर अवलंबून 

कुंदुरु जनारेड्डी हे तेलंगणा काँग्रेसच्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत.  काँग्रेसचे जुने दिग्गज आणि अनुभवी नेते जनारेड्डी तेलंगणात पक्षाच्या सत्तेतील पुनरागमनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तेदेप, भाकप आणि अन्य पक्षांसोबत महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेस सत्तारुढ टीआरएसला चुरशीचे आव्हान देत आहे.

40 वर्षांपेक्षा अधिक काळ राजकारणात

संयुक्त आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्हय़ातून राजकारणास प्रारंभ करणाऱया जनारेड्डी यांच्याकडे राज्याच्या राजकारणात 40 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. टीआरएसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते. वायएसआर यांच्या आंध्रप्रदेशच्या सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांचे कामकाज हाताळले आहे.

एनटीआर यांच्याशी मतभेद

1988 मध्ये एटीआर यांच्यासोबत मतभेदानंतर जनारेड्डी तेदेपमधून बाहेर पडले. काही काळानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते नेहमीच काँग्रेसचे निष्ठावंत राहिले आहेत.

7 वेळा निवडणुकीत विजय

एकूण 7 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकलेले जनारेड्डी हे केवळ दोनदा पराभूत झाले आहेत. 1983 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेल्या जनारेड्डी यांना 1994 च्या निवडणुकीत किरकोळ मतांच्या अंतराने पराभव चाखावा लागला होता.