|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » ‘जोसेफ सिरोश’नी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडली

‘जोसेफ सिरोश’नी मायक्रोसॉफ्ट कंपनी सोडली 

सॅन फ्रन्सिस्को :

मूळ भारतीय असणारे सिरोश हे मागील पाच वर्षांपासून मायक्रासॉफ्ट कंपनीत  मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु ते ही कंपनी सोडून अमेरिकेतील रियल इंस्टेड कंपनीत रुजू होणार असल्याची माहिती सिरोश यांनी ट्वीट करुन दिली आहे. केरळ राज्यातील त्रिशूल जिल्हय़तील ते रहिवाशी असून त्यांनी आपले शिक्षण मद्रासमध्ये आपली पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे. तंत्रज्ञांनाचा वाढता वापर घराची खरेदी विक्री करण्यासाठी आताच्या काळात सोपे मार्ग निर्माण करुन देत असून या व्यासपीठाचा मोठय़ा प्रमाणात वापर वाढत जात असल्याची माहिती यावेळी सिरोश यांनी दिली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी येण्याच्या अगोदर 9 वर्षे त्यांनी ई रिटेल कंपनीच्या उपअध्यक्ष पदावर काम पाहिले आहे. भारताला येणाऱया काळात शेती, हेल्थकेअर आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.