|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » कमजोर विदेशी संकेतामुळे बाजार कोसळला

कमजोर विदेशी संकेतामुळे बाजार कोसळला 

वृत्तसंस्था /मुंबई :

जागतिक घडामोडी व विदेशी संस्थामध्ये झालेल्या विक्रीमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. बीएसईचा निर्देशांक 572 अंकानी घसरत जात कोसळला असून राष्ट्रीय शेअर बाजारतही घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांच्या बाजार घसरणीचा आलेख पाहता ही सर्वांत मोठी घसरण असल्याची नोंद भारतीय शेअर बाजारात करण्यात आली.

बीएसईचा निर्देशांक 1.59 टक्क्यांनी घसरण होत 35,312.13 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारात 1.69 टक्क्यांनी घसरत 10,601.15 वर बंद झाला. बीएसई आणि निफ्टी यांच्यात धातू, ऑईल ऍण्ड गॅस, औषध आणि फायनान्स कंपन्यांमध्ये काही प्रमाणात सावरल्याचे पहावयास मिळाले तर अन्य कंपन्याचे शेअर्स मोठय़ा प्रमाणात कोसळेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेली व्यापारा संदर्भात सुरु असणाऱया   चर्चमुळे मोठा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. ओपेक आणि इतर  तेल दराबद्दल सुरु होणाऱया चर्चेच्या अगोदरच जागतिक स्तरावर बाजारात कमजोर वातारण तयार झाले.

व्यापारा दरम्यान रुपया 36 पैशांनी कमजोर होत गुरुवारी डॉलरच्या तुलनेत 70.82 पर्यंत मूल्ये राहिले आहे. त्याचाही काहीसा प्रभाव बीएसईच्या निर्देशांकांवर झाल्याचे पहावयास मिळाले.

दिग्गज कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, येस बँक, भारती एअरटेल, अदानी पोर्ट, एशियन पेन्टस, कोटक बँक, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक याच्या समभागांत 5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर सन फार्मा कंपनीचा निर्देशांकांत 1.57 टक्क्यांची वधार झाल्याची नोंदणी करण्यात आली.

येणाऱया काळात आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक सुरु असलेल्या बैठकि दरम्यान तणाव निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेअर बाजारांना होणार नसल्याची मते तज्ञांकडून यावेळी नोंदवण्यात येत आहेत.