|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » केंद्रीय पथकाने पंधरा मिनिटात दौरा गुंडाळला

केंद्रीय पथकाने पंधरा मिनिटात दौरा गुंडाळला 

सांगोला/ मंगळवेढा :

जिह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक जिह्यात दुसऱया दिवशी सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात पाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी आले अन् वाट पहात बसलेल्या शेतकऱयांच्या तोंडाला पावसाप्रमाणेच पानं पुसुन गेले असे म्हणावे लागेल. सांगोला तालुक्यातील राजापूर तर मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावात येथे गुरुवारी सकाळी पथकाने पाहणी करण्यासाठी आले होते मात्र, पाहणी दौरा 15 मिनिटातच उरकून पथकाने सांगली जिह्याकडे जाणे पसंत केले. पदाधिकारी आणि शेतकरी आस लाऊन बसलेल्यांच्या पदरी घोर निराशा आली. केवळ पाहणी करण्याचे नाटक करुन पथक आश्वासन देऊन निघुन गेले.

   केंद्रीय पथक सांगोल्यातील राजापुर गावातील यशवंत पुजारी यांच्या शेतात आले. या पथकांमध्ये सुभाषचद्र मीना, एम.जी. टेंभुर्णे व विजय ठाकरे यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नाना सोनवणे, सहआयुक्त प्रमोद बाबर, तहसिलदार संजय पाटील, गटविकास 

अधिकारी संतोष राऊत यांच्यासह तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातला दुष्काळासंबंधी निवेदन देण्यासाठी आ. गणपतराव देशमुख यांनी वेळेवर उपस्थिती दाखविली. पण पथकाने मात्र आपला दौरा फक्त 15 मिनिटातच उरकल्याने अधिकाऱयांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाहणी दौऱयामध्ये पुजारी विहीरीची पाहणी करुन लवकरात लवकर तोडगा निघेल असे आश्वासन दिले.

   मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथे सिताराम बापू वेळापूरे यांच्या शेताला भेट दिली. पाण्याअभावी सुकून गेलेली ज्वारी, भुईमुग, तूर यांची पाहणी करून पथक मार्गस्थ झाले. सिताराम वेळपुरे यांच्याकडे दौऱयामधील अधिकारी वर्गाने तुमच्याकडे किती शेती आहे ? कोणती पिके घेतली जातात ? पेरणी किती केली? सिंचन स्त्राsत व पाण्यात स्थिती काय? पिकविम्याचा मोबदला मिळाला का ? आदि प्रश्न केले असता, खरिप -रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले असुन, थोडय़ाफार पावसावर व पाऊस पडेल या आशेवर शेतीची मेहनत, पेरणी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केला पण दोन्हीपैकी एकाही हंगामातील पिक हाती लागले नसल्याने जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, मजुरांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा दुष्काळ जाहिर होऊन पण काही झाले नाही, आता तुम्ही आलात आता तुम्ही तर काही करा. गावात वाडी वस्तीवर जानावरंना व माणसांना प्यायला पाणी नाही एका जनावरांना पिण्यासाठी दिवसभरात 100-150 लिटर पाणी लागते. टँकरची सुविधा उपलब्धकरुन जनावरांना पाणी द्यावे. जनावरे व माणूस यांना भेदभाव करु नये असा पाढाच त्यांच्यापुढे वाचला.