|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मँचेस्टर सिटी-अर्सेनल लढत बरोबरीत

मँचेस्टर सिटी-अर्सेनल लढत बरोबरीत 

वृत्तसंस्था /लंडन :

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत ओल्ड ट्रफोर्ड येथे बुधवारी झालेल्या सामन्यात अर्सेनलने मँचेस्टर युनायटेडला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले तर दुसऱया एका सामन्यात बर्नेलीचा 3-1 असा पराभव केला.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या मँचेस्टर सिटीपेक्षा लिव्हरपूलचा संघ दोन गुणांनी मागे आहे. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात टॉटनहॅम हॉटस्परने साऊदम्पटनचा 3-1 असा पराभव केला. चेल्सीने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चौथे स्थान मिळविले असून सरस गोल सरासरीवर अर्सेनलला त्यांनी मागे टाकले आहे. चेल्सीने वाँडरर्सचा 2-1 असा पराभव केला. टॉटनहॅमने 33 गुण मिळविले असून लिव्हरपूलने 39 गुण घेतले आहेत. साऊदम्पटन, बर्नेली आणि फूलहॅम यांनी प्रत्येकी 9 गुण मिळविले आहेत.