|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 15 डिसेंबर पासून सेरेंडिपिटी महोत्सव

15 डिसेंबर पासून सेरेंडिपिटी महोत्सव 

पणजी :

 सेरेंडिपिटी कला महोत्सव 15 ते 22 डिसेंबर पर्यंत गोव्यात होत असून या निमित्त देश विदेशातील अनेक कलाकार प्रतिनिधी गोव्यात येणार आहे. या महोत्सवाचे हे  गोव्यातील तिसरे वर्ष असून मागिल दोन वर्षे हा महोत्सव  मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला होता, अशी माहिती विवेक मिनेझिस यांनी काल पत्रकार परिषदेत दिशी

 गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी अनेक दर्जेदार कलाकार आपली कला सादर करणार आहे. अनेक कलांचा संगम असलेला जागतिक दर्जाचा असा हा महोत्सव आहे. नविन कलाकारांसाठी हा महोत्सव म्हणजे शिकण्याची एक चांगली संधी आहे. यात नृत्य, गायन, चित्रकला, संगीत, पाककला, अशा विविध कलाकारांचा सहभागी असलेला हा महोत्सव मागिल दोन वर्षे चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला होता. हा महोत्सव पणजीतील विविध ठिकाणी आम्हाला पहायला मिळणार आहे.

 सेरेंडिपिटी महोत्सवासाठी गोवा हे आता कायम स्वरुपी ठिकाण झाले असून प्रत्येक वर्षी हा महोत्सव गोव्यात साजरा केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये अनेक कलांचे सादरीकरण, कार्यशाळा, प्रदर्शन आम्हाला पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनेक नविन कलांचा आस्वादही आम्हाला घ्यायला मिळणार आहे. गोव्यातील कलाकरांसाठी ही चांगली संधी आहे. गोव्यातही अनेक कलाकार आहे त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. कलाकारांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा. सेरेंडिपिटी महोत्सवात आम्हाला आंतराष्ट्रीय दर्जाचा कलाकारांचा कलेचा अस्वाद घ्यायला मिळणार आहे, असे यावेळी स्वाती साळगांवकर यांनी सांगितले.