|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुडचडेत सहकार भांडाराला आग

कुडचडेत सहकार भांडाराला आग 

प्रतिनिधी /कुडचडे :

कुडचडे येथील सहकार भांडाराच्या शाखेला गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास आग लागल्याने सदर आस्थापनाच्या पहिल्या मजल्यावर असलेला माल व महत्त्वाची कागदपत्रे जळून गेल्याची माहिती कुडचडे पोलिसांनी दिली. या घटनेत 1 कोटीहून अधिक हानी झाली असल्याचा दावा शाखेचे व्यवस्थापक उल्हास नाईक यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5 च्या सुमारास सदर आस्थापनातून धूर येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी आणि लगेच अग्निशामक दलाला बोलाविले. सदर आग आस्थापनाच्या पहिल्या मजल्यावर लागल्यामुळे व आतमध्ये जाण्यासाठी अन्य कोणताच पर्याय नसल्यामुळे पहिल्या मजल्यावरचा दरवाजा तसेच मुख्य दरवाजाचे टाळे तोडून अग्निशामक दलाला आत पाठविण्यात आले. मुख्य दरवाजा उघडण्यासाठी पोलिसांना भरपूर परिश्रम घ्यावे लागले. शेवटी हायड्रॉलिक कटिंग मशिन आणून शटरचे सेंट्रल लॉक तोडण्यात आले. यात अंदाजे पाऊणतास गेला.