|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कँटरसह 11 लाखाचा दारूसाठा जप्त

कँटरसह 11 लाखाचा दारूसाठा जप्त 

प्रतिनिधी /बेळगाव :

गोव्याहून महाराष्ट्रात नेण्यात येत असलेल्या कँटरसह 11 लाखाचा बेकायदा दारूसाठा अबकारी अधिकाऱयांनी जप्त केला. कणकुंबीजवळ गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अबकारी अधिकाऱयांनी कँटर अडवताच नाशिक जिल्हय़ातील दोघाजणांनी कँटर तेथेच सोडून पलायन केले.

एमएच 17 बीवाय 2115 क्रमांकाच्या कँटरमधून 141 बॉक्स दारूसाठा भरून महाराष्ट्रात नेण्यात येत होता. याची माहिती मिळताच अबकारी विभागाचे सहआयुक्त वाय मंजुनाथ, अधीक्षक अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजय कुमार हिरेमठ, निरीक्षक किरण चंदरगी, निरीक्षक आर. पी. होसळ्ळी, सिद्धाप्पा आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने कणकुंबीजवळ कँटर अडविला.

यावेळी कँटरमधील दोघाजणनी कँटर तेथेच सोडून पलायन केले. कागदपत्रांवरून अधिकाऱयांनी त्यांची नावे मिळविली असून गणेश पागार (रा. कोपरगा), शाम जाधव (रा. सिन्नर), अशी त्यांची नावे आहेत. कँटरसह 141 बॉक्स बेकायदा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या बेकायदा दारूसाठय़ाची किंमत 4 लाखाच्या घरात तर कँटरची किंमत 7 लाख रुपये इतकी होते. कँटरसह बेकायदा दारूसाठा सायंकाळी बेळगावला आणण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱयांनी त्या वाहनाची पाहणी केली. त्या दोघाजणांविरूद्ध अबकारी विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.