|Friday, May 24, 2019
You are here: Home » leadingnews » तेलंगणा, राजस्थानमध्ये मतदान

तेलंगणा, राजस्थानमध्ये मतदान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधनसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी 2274 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विशेष रणनीती आखून प्रचारात घेतलेली आघाडी सर्वेक्षणां आकडे व सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढते का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, तेलंगणामध्ये 119 जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. येथे 32 हजार 715 केंद्रांवर मतदान होत आहे. अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. मतदारराजानं कोणाला आपला कौल दिला आहे, याचा निकाल 11 डिसेंबरला लागणार आहे.

 

Related posts: