|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » धक्कादायक, मेथीची भाजी खाल्याने महिलेचा मृत्यू

धक्कादायक, मेथीची भाजी खाल्याने महिलेचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / जळगाव :

जळगावमध्ये शेतातील कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाध होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. या प्रकरणामुळे फळभाज्यांवर फवारल्या जाणाऱया किटकनाशकांमुळे होणाऱया विषबाधेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

 

जळगावमधील धरणगाव येथे राहणाऱया अंजूबाई पाटील यांनी शेतामधील मेथीची भाजी घरी आणून ती खाल्ली. त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये विषबाध झाल्याचे अंजूबाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अंजूबाई पाटील यांचे शवविच्छेदन झाले असून प्राथमिक अहवालात त्यांच्या शरिरामध्ये किटकनाशकांचा अंश अढळून आला. पुढील चाचण्यांसाठी धुळय़ातील मेडिकल कॉलेजमध्ये शविविच्छेदनासंदर्भातील नमुणे पाठवण्यात आले असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल एक ते दीड महिन्यांमध्ये येईल.

 

Related posts: