|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » बुलेट ट्रेन : जपानी अधिकारी शेतकऱयांना भेटणार

बुलेट ट्रेन : जपानी अधिकारी शेतकऱयांना भेटणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट टेन प्रकल्पाला शेतकऱयांचा होत असलेला विरोध लक्षात घेता आता थेट जपानचे अधिकारी भारतात दाखल झाले आहेत. हे अधिकारी शेतकऱयां शी चर्चा करणार आहेत.

जपान इंटरनॅशन कॉ-ऑपरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) भारताला कमी व्याज दरात बुलेट टेनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजनही मोठ्या थाटात पार पडलं. मात्र, शेतकऱयांनी या भूसंपादन प्रक्रियेला विरोध दर्शवला. या सर्व प्रकारामुळे हा प्रकल्प बासनात बांधून ठेवावा लागतो की काय, असा पेच निर्माण झाला. अशातच आता जपानचे अधिकारी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. जपानच्या अधिकाऱयांचे एक पथक शुक्रवारी भारतात दाखल झाले असून, ते शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

 

Related posts: