|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भारताची दमदार खेळी : दुसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 7 बाद 191

भारताची दमदार खेळी : दुसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 7 बाद 191 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 250 धवा केल्या आहेत. त्यामुळे उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर खेळत आहेत.

 

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात ऍरोन फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर हॅरिस आणि ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱया विकेटसाठी 45 धवांची भागीदारी झाली. अखेर रविचंद्रन आश्विनने हॅरिसला माघारी धडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडय़ांच्या मोबदल्यात 57 धवांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर हॅरिस 26 धवांवर बाद झाला. अनुभवी शॉन मार्शला 2 धवांत अश्विनने माघारी धडले. लगेचच ख्वाजा 28 धवांवर तंबूत परतला. त्यामुळे चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 117 अशी झाली होती. त्यानंतर तिसऱया सत्रात पीटर हॅडंसकोम्ब 34 धवांवर बाद झाला. पाठोपाठ कर्णधर टीम पेनदेखील 5 धवा करून माघारी परतला.

 

या आधी भारताने पहिल्या डावात 250 धवांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडी भारताच्या धवसंख्येत काही धवांची भर घालेल, अशी आशा होती. मात्र जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर दुसऱया दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल दिला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 3 तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.