|Friday, May 24, 2019
You are here: Home » leadingnews » राहुरीच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

राहुरीच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ 

ऑनलाईन टीम  / अहमदनगर :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रगीतानंतर खुर्चीवर बसत असतानाच भोवळ आली. गडकरिंवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मिळत आहे. शुगर कमी-जास्त झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्मयता वर्तवली आहे. परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.

अहमदनगरच्या राहुरी मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. गडकरी यांच्या भाषणानंतर राष्ट्रगीत सुरु असताना गडकरिंना अचानक चक्कर आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरिंना सावरले.

या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. राष्ट्रगीतानंतर ते खुर्चीवर बसत असताना त्यांना चक्कर आल्याने ते कोसळले. यावेळी राज्यपालांनी त्यांनी सावरलं. यानंतर डॉक्टराचं एक पथक तिथे दाखल झाले. त्यांनी गडकरिंना इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती स्थिर असून, तेथून ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊन गडकरि विशेष विमानाने नागपूरला जाणार आहेत. नितीन गडकरिंच्या नियोजित कार्यक्रमांमधील हा शेवटचा कार्यक्रम होता.

गडकरिंनी यानंतर प्रतिक्रिया दिली यावेळी ते म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित आहे. शरिरातील साखर कमी झाल्याने माला भोवळ आली. माझ्या सगळ्या हितचिंतकांचे आभार मानतो.

Related posts: