|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » प्रेमीयुगलाची गळफास घेवून आत्महत्या

प्रेमीयुगलाची गळफास घेवून आत्महत्या 

ऑनलाईन टीम / परभणी :

औंढा नागनाथ येथील गोकर्णाच्या माळावर एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतदेह कुजलेले असल्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

औंढा शहरापासूनच नजीकच असलेल्या गोकर्णाच्या माळावर आज सकाळी मजूर कामाला गेले होते. त्यांना दुर्गंधी जाणवत असल्याने आजूबाजूला पाहणी केली असता या प्रेमीयुगुलाचे मृतदेह झाडावर लटकलेले आढळले. यानंतर त्यांनी वन विभागाला कळविले. वनविभागाने हट्टा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या दोघांनी एकाच ओढणीने दोन टोकांना गळफास घेतला. तर झाडाखाली विषाची रिकामी बाटलीही आढळली. यातील मुलीची ओळख पटली असून ती औंढा तालुक्मयातील एका गावची आहे. ती मागच्या शनिवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. औंढ्यात एका महाविद्यालयात ती बारावीत शिकत होती. वडिलांनी तिचा शोध घेवूनही ती सापडत नव्हती. आज तिचा मृतदेहच आढळून आला. मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघांचेही प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन केले जाणार आहे.

Related posts: