|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कठीण काळात देशाला पुढे नेण्याचे काम कॉंग्रेसने केले ; माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे

कठीण काळात देशाला पुढे नेण्याचे काम कॉंग्रेसने केले ; माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे 

ऑनलाईन टीम / पुणे :
कॉंग्रेस जनजागृती कार्यक्रम शहरात सातत्याने अनेक वर्ष होत आहे. हे सुंदर असे चित्रप्रदर्शन असून ज्यामध्ये गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसने काय केले, याची लोकांना ऐतिहासिक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉंग्रेसने अतिशय कठीण काळात देशाला पुढे नेण्याचे काम केले, त्याचे चित्रण यामध्ये दाखविण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. 
कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्याच्या विकासात कॉंग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र लई झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले. त्याचा समारोप शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सप्ताहाचे यंदा १४ वे वर्ष आहे. 
मोहन जोशी म्हणाले, कॉंग्रेसने देशाच्या विकासासोबतच पुण्यामध्ये देखील अनेक विकासकामे केली आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून ही कामे पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक संस्थांप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवर संस्थांची कॉंग्रेसने उभारणी तर केलीच पण सामान्यांसाठी लागणारी वाहतूक व्यवस्था व इतर सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे पुण्याच्या विकासातील कॉंग्रेसचे योगदान देखील चित्रांतून प्रदर्शनात मांडण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Related posts: