बेंगळूर मेट्रो निर्माणाकरीता महसुल विभागाने दिली 16 एकर जामीन

ऑनलाईन टीम / बेंगळूर :
दुसऱया विभागातील काडुगेडी मेट्रो मार्ग निर्माणाकरीता 16 एकर जमीन देण्याचा निर्धार महसुल विभागाने केला आहे. सरकारचे मुख्य़ कार्यनिर्देशक टी. एम विजय भास्कर, महसूल, अरण्य आणि बीएमआरसीएम च्या वरीष्ठ अधिकाऱयांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 72.1 किलोमिटर मेट्रो मार्ग निर्माण करण्यासाठी सुमारे 32 हजार रूपये कोटी पर्यंतचा खर्च येणार आहे.
सदर मेट्रोकरीता ही जागा मंजुर करण्यात आली असुन यामधील जागा मालकांना 6,293 कोटी रूपयांपर्यंतचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर मेट्रो मार्ग निर्माण करण्याकरीता सरकारचे पदाधिकारी विविध विभागाच्या अधिकाऱयांबरोबर चार्चा करत आहेत.