|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम नवे आर्थिक सल्लागार

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम नवे आर्थिक सल्लागार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे अरविंद सुब्रह्मण्यम यांची देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सुब्रह्मण्यम यांची जगातील आघाडीच्या बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नेंस आणि इकॉनॉमिक पॉलिसी एक्सपर्ट्समध्ये गणना होते. सरकारने एक पत्रक काढून ही घोषणा केली आहे. कृष्णमूर्ती हे अरविंद सुब्रह्मण्यम यांची जागा घेतील. अरविंद सुब्रह्मण्यम यांनी जुलै महिन्यात वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला होता.

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये फायनान्सचे असोसिएट्स प्रोफेसर आहेत. तसेच सेंटर फॉर ऍनॅलिटिकल फायनान्समध्ये एक्झक्मियुटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. सुब्रह्मण्यम यांनी शिकागो बूथ येथून पीएचडी पदवी मिळली आहे. तसेच ते आयआयटी आणि आयआयएमचे विद्यार्थी होते. ऍकॅडमिक करिअरची सुरुवात करण्यापूर्वी सुब्रह्मण्यम यांनी न्यूयॉर्कमधील जे. पी. मॉर्गन चेजसोबत सल्लागार म्हणून काम पाहिले होते. तसेच ते आयसीआयसीआयचे एलिट डेरिवेटिव्ह ग्रुपच्या मॅनेजमेंट रोलमध्येही त्यांनी आपली सेवा दिली आहे.