|Saturday, May 25, 2019
You are here: Home » उद्योग » जॅगॉरच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये घट

जॅगॉरच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये घट 

नवी दिल्ली

 टाटा मोटर्सच्या अंतर्गत कार्यरत  असणारी जॅगॉर लॅन्ड रोवर(जेएलआर) यांच्या वाहन विक्रीत नोव्हेंबर 2018मध्ये घट झाल्याची नोंद करण्यात आली असून एकूण 48 हजार 160 इतक्या युनिट्ची विक्री झाली असल्याची माहिती कंपनीकडून शुक्रवारी सादर केली आहे.

विक्रीत झालेली घट ही मागील वर्षांशी तुलना केल्यास यदाच्या नोव्हेंबरमध्ये विक्रीचा आकडा समानच असल्याची नोंद करत सदर विक्रीतल घटीची टक्केवारी 8 टक्के नेंदवण्यात आली आहे. कंपनीला अनेक अडथळय़ाचा सामना चीनमध्येही करण्यात येत आहे.  परंतु जॅगॉर बॅण्डचा रिटेल विक्रचा दर हा 8.9 टक्क्यांवर असून त्यात एकूण 14 हजार 909 युनिट्ची विक्री नोव्हेंबरमध्ये झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. लॅन्ड रोवरशी संबंधीत असणाऱया वाहनांची विक्री नोव्हेंबरमध्ये 33 हजार 251 इतकी होत असून यात वर्षांकाठी 14 टक्क्यांनी  घसरण होत असल्याची नोंद करण्यात येत आहे. चीनमध्ये तर 50.7 टक्क्यांनी विक्रीत घटीची नोंद करण्यात आली आहे.

 

Related posts: