|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » ‘जीआय’ टॅग असणारी उत्पादने रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध

‘जीआय’ टॅग असणारी उत्पादने रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध 

नवी दिल्ली

 एका विशेष दर्जाची 300 हून अधिक उत्पादने लवकरच रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी आगामी काळात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय टॅग) दर्जाच्या उत्पादनांचा असणार आहेत. बनारशी साडय़ा, चंदेरी प्रॅब्रिक आणि मुरादाबादी धातुचे क्राफ्ट यांचा समावेश केला जाणार आहे. डिपार्टमेन्ट ऑफ इंडस्ट्रीयलकडून व्यवसायांना चालना देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम येणाऱया काळात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सदर उत्पादने मार्केटींगचा विचार करता मुख्य बाजारपेठासह इतर रिटेल बाजारात जीआय उत्पादनांना जागा मिळावी यांच्यासाठी त्या उत्पादनांमध्ये चांगला दर्जा आणि इतर महत्वाच्या गोष्टीची पडताळणी करूनच या जीआय उत्पादनांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱयांनी दिली आहे.

  जीआयचा दर्जा.. 

देशातील जवळपास 325 उत्पादनांना जीआय टॅगचा दर्जा देण्यात आलेला आहे. याच्यात महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची ब्लू पॉटरी आणि तिरुपतीचा लाडू यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर 2014 मध्ये देशातील दाजिर्लिग चहाच्या उत्पादनाचा समावेश करण्यात आलेला आहे.