|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात तेजी

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात शेअर बाजारात तेजी 

सेन्सेक्स 360 अंकानी वधारला, निफ्टी 10,700 च्या जवळपास

वृत्तसंस्था/ मुंबई

देशातील पाच राज्यांच्या निवडणूका शुक्रवारी संपन्न झाल्या आहेत. त्यांच्या निकाला अगोदरच त्याचे विविध प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक्झिट पोल सादर होत असतानाच भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांकांनी तीन शतकी आकडा पार करत बंद झाला आहे.

सप्ताहाच्या शेवटच्या दिवसांमध्ये बीएसईचा निर्देशांक 35,650 वर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक ही 10,700 च्या जवळपास जात बंद झाला. शुक्रवारी दिवसभरातील व्यवहारात बँकिंगच्या समभागांची सर्वात जादा विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाजारात निफ्टीमध्ये 396 अंकानी वधारत होत बंद झाली.

मिडकॅपचे शेअमर्समध्ये तेजी राहिली असून त्याचा निर्देशांक वधारल्याची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे स्मॉलकॅप शेअर्समध्ये नरमाई राहिली. बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वाढत जात तो 14,717.49 वर बंद झाला तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.3 टक्क्यांनी कमजोर होत 14,104.65 वर बंद झालेला आहे.

 पीएसयू बँकेच्या शेअर्समदये कमजेरी दिसून आली. परंतु प्रायव्हेज बँकांच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाली. असून यांच्या बरोबरच बँक निफ्टीत 1.5 टक्क्यांची वधारत होत 26,594.30 चा टप्पा पार करत बंद झाला आहे. ऑटो. एफएमसीजी, रियल्टी यांच्या शेअर्समध्ये तेजी पहावयास मिळाली. आयटी आणि धातू या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वात जादा कमजोरी पहावयास मिळाली.

आगामी काळात बाजारांची वाटचाल ही पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालांवर अंवलबून राहणार असल्याची मते शअर बाजारातील तज्ञांकडून मांडण्यात येत आहेत. तेव्हा होणाऱया घडामोडीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: