|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

9 ते 15 डिसेंबर 2018

मेष

चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहेत. अडचणी संपलेल्या नाहीत तरी तुम्ही मार्ग काढू शकाल. सौम्य धोरण ठेवा. गोडबोला. समोरच्या व्यक्तीचा नीट अभ्यास करा. म्हणजेच राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे पटवून देऊ शकाल. धंद्यात मेहनत घ्या. उतावळेपणाने पटापट कामे होतील, असे समजू नका. घरातील माणसे तुम्हाला मदत करतील. कला, क्रीडा शिक्षण क्षेत्रात जिद्द ठेवा. वाकडे पाऊल टाकू नका.

वृषभ

चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र, बुध केंद्रयोग हेत आहे. धंद्यातील अडचणी कमी करता येतील. मोठे काम याच सप्ताहात मिळवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. वरि÷ मदत करतील. घरातील वाद रविवार, सोमवारी वाढेल. नोकरीत वचक राहील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. मोठय़ा लोकांचा परिचय होईल. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात प्रगती होईल. घरातील माणसांच्या बरोबर सत्याने वागा.

मिथुन

चंद्र,मंगळ लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहेत. मंगळवार, बुधवारी मान प्रति÷sचा प्रश्न निर्माण होईल. तुमच्यावर आरोप येईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. जवळचे लोक मदत करण्याचा प्रयत्न करतील. धंद्यात वाद होईल. तुमची दादागिरी समस्या वाढवणारी होऊ शकते, याची काळजी घ्या. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात तडजोड करावी लागेल. अभ्यासात लक्ष द्या. कोर्टकेस कठीण असेल.

कर्क

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, मंगळ युती होत आहे. या सप्ताहात सर्वच ठिकाणी अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. मारामारीचा प्रसंग टाळा.  कायद्याचे पालन करा. धंद्यात काम मिळेल. राजकीय, सामाजिक  कार्यात तुमचे विचार नम्रतेने सांगा. मैत्री सांभाळा. घरातील व्यक्तींना कमी समजू नका. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगति होईल. शिक्षणात मेहनत घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते.

सिंह

चंद्र, मंगळ लाभयोग, चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. जुना वाद नव्याने धंद्यात निर्माण होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात निश्चयाने काम करा. तुमचे विचार कमकुवत करण्याचा प्रयत्न गुप्तशत्रू, विरोधक करतील. सहकारी मदत करतील. कला क्रीडा क्षेत्रात गोंधळ होऊ शकतो. अभ्यासाचा नित्यक्रम ठरवा. कोर्टाच्या कामात सावध रहा. संसारात शुभ समाचार मिळेल.

कन्या

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. या सप्ताहात विरोधक हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला योग्य शब्दात उत्तर देता येईल. व्यवसायाला  मोठे स्वरुप देता येईल. थकबाकी वसूल करण्यात अडचणी येऊ शकतात. राजकीय, सामाजिक कार्यात कामाचा वेग वाढवा. लोकांना भेटा, अडचणी समजून घ्या. लोकप्रियता वाढवा. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात अडथळे आले तरी तुमचे वर्चस्व राहील. नोकरी मिळेल.

तुळ

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. किरकोळ वादाला जास्त महत्त्व देऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. मोठी कामे करण्यासाठी तुमची नेमणूक  करतील. घरातील वातावरण आनंदी  राहील. शुभ समाचार मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. नवीन परिचय होईल. मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. शिक्षणात प्रगती होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. घर घेता येईल.

वृश्चिक

साडेसातीचा शेवटचा भाग सुरू आहे. बुध, हर्षल षडाष्टक योग, चंद्र, मंगळ युती  होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनतीचा फायदा मिळेल. लोकांचे मत  जाणणे कठीण होईल. घरातील व्यक्तीची चिंता वाटेल. किरकोळ तणाव घरात होऊ शकतो. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. शिक्षणात मेहनत घ्या. नोकरीत  तणाव कमी होईल.

धनु

साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, मंगळयुती होत आहे. वादाचा प्रसंग सर्वच ठिकाणी येईल. तुमचे मानसिक संतुलन ठीक राहील. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. गुप्त कारवाया होतील. सावध रहा. कला क्रीडा शिक्षण क्षेत्रात प्रयत्न व मेहनत यावर भर द्या. घरातील माणसे तुम्हाला मदत करतील. कोर्टाच्या कामात अडचणी येतील. तरीही  मार्ग शोधता येईल. धंद्यात दुर्लक्ष नको.

मकर

चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, चंद्र केंद्रयोग होत आहे.  साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. रविवार, सोमवारी खर्च वाढेल. कामात अडचणी येतील. धंद्यात मोठी वाढ करता येईल. प्रयत्न करा. याच सप्ताहात महत्त्वाची कामे करून घ्या. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. तुमच्या योजनेला नवी दिशा मिळेल. घरात शुभ समाचार शुभवार्ता ठरेल. कला,क्रीडा, शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी  होईल. कोर्टकेस संपवता येईल.

कुंभ

चंद्र, शनि युती, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवारीत रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. गुप्त कारवायांचा त्रास जाणवेल. धंद्यात मोठे काम सुरू होईल. प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार होईल. दौऱयात मान मिळेल. लोकप्रियता वाढेल, असे काम करा. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. कोर्टकेसमध्ये निकाल. परीक्षेत मोठे यश प्राप्त होईल.

मीन

 चंद्र, बुध लाभयोग, चंद्र मंगळ युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे काम करा. धंद्यात सुधारणा होईल. मोठे लोक मदत करतील. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ तुमच्या कामाचे कौतुक करतील. पद मिळू शकेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. छोटी दुखापत झाल्याने कामात अडचणी येऊ शकतात. परीक्षेसाठी नियमित अभ्यास करा. यश मिळेल. कोर्टकेसमध्ये नम्रपणे बोला. घरातील व्यक्तीच्या बरोबर वाद संभवतो.