|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सांबरा साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ

सांबरा साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ 

वार्ताहर / सांबरा

सांबरा येथे माय मराठी संघाच्यावतीने दि. 16 डिसेंबर रोजी होणाऱया तेराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या शामियान्याची मुहूर्तमेढ रविवार दि. 9 डिसेंबर रोजी रोवण्यात आली. प्रारंभी सकाळी 9 वाजता गावातील श्री दुर्गादेवी मंदिरापासून वाजत गाजत मुहूर्तमेढ संमेलन स्थळापर्यंत आणण्यात आली. यावेळी माय मराठी संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. गेल्या बारा वर्षांपासून माय मराठी संघाच्यावतीने येथे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. संत साहित्य व आधुनिक पद्धतीच्या शेतीवर येथे अनेक मान्यवरांची सत्रे झाली आहेत.

यावर्षीही संमेलनात विदर्भ येथील शेतकरी नेते बच्चू कडू हे खास शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी संमेलनाचा लाभ घ्यावा. तसेच संमेलनासाठी दरवर्षी सहकार्य करणाऱया वारकरी मंडळी व देणगीदारांचे आभार मानले.

त्यानंतर हभप हणमंत जत्राटी व महादेव पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी माय मराठी संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपले आई व वडील कै. महादेव दत्तात्रय चव्हाण व कै. सुलोचना महादेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ संघाला पालखी भेट म्हणून दिली.

याप्रसंगी नागेश देसाई, भुजंग जोई, इराप्पा गिरमल, पिराजी पालकर, वाय. के. धर्मोजी, मारुती जत्राटी, रामचंद्र देसाई, मोहन देसाई, गंगाधर तिम्मापूरमठ, के. बी. जत्राटी, शिवाजी धर्मोजी, भरभा धर्मोजी, शिवाजी जोगाणी, आयुब शिरगुप्पी, मारुती चिंगळी, खेमाण्णा पालकर, हभप यल्लाप्पा गिरमल, महादेव जत्राटी, नागो जोई, इराप्पा हुच्चीसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महादेव पाटील, हणमंत जत्राटी, गंगाधर तिम्मापूरमठ व भागाण्णा सनदी यांनी देणगी दिली.