|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » leadingnews » महापालिका निवडणूक : नगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना ठरणार किंगमेकर

महापालिका निवडणूक : नगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना ठरणार किंगमेकर 

ऑनलाईन टीम / धुळे / नगर :

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतानाच राज्याच्या नजरा धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीकडे आहे. धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महापालिका निवणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या.

 सोमवारी दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन दुपारी बारानंतर निकाल हाती लागण्यास सुरुवात होईल. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला़ नगर व धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहील, अशी शक्यता आहे.

 •     भाजपा – १८,शिवसेना – १७,आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी) – २५,इतर – ०८
 • अनिल गोटेंच्या पत्नी हेमा गोटे आघाडीवर
 • अहमदनगर : शिवसेना 12, भाजप 20, आघाडी 12, इतर 3
 • धुळे : भाजप 23, आघाडी 15, लोकसंग्राम 2 आणि इतर 1 जागी
 • धुळे आणि अहमदनगरमध्ये भाजपची मोठी आघाडी, धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दुसऱ्या स्थानी, अहमदनगरमध्ये शिवसेना दुसऱ्या स्थानावर
 • धुळे : प्रभाग 14 मध्ये भाजपाचे चारही उमेदवार आघाडीवर
 • धुळे : भाजप 4,  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर
 • अहमदनगर : शिवसेना 5, भाजप 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 5, इतर 3 जागी आघाडीवर
 • धुळे : भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर

 

 • धुळे : भाजप 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 1 जागी आघाडीवर
 • अहमदनगरमध्ये भाजपला दोन जागांवर आघाडी
 • धुळे महापालिकेचा पहिला कल हाती, भाजपला दोन जागांवर आघाडी
 • अहमदनगर – एकूण 6 निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक अधिकाऱ्यासमोर चार टेबल, एकूण 24 टेबल, यातील 17 टेबलवर प्रभागनिहाय मतमोजणी होणार
 • धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
 • धुळ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात
 • धुळे महापालिकेतील एक जागा बिनविरोध, प्रभाग 12 ‘अ’ मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड