|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » धुळ्यात भाजपची मुसंडी

धुळ्यात भाजपची मुसंडी 

ऑनलाईन टीम /अहमदनगर :

महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये भाजपाचे ‘कमळ’ फुलण्याचा सिलसिला धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हातात हात आणि शिवसेनेनं सोडलेली साथ, अशा परिस्थितीतही भाजपाने  धुळ्यात  मुसंडी मारली आहे.

2013 साली झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. अहमदनगरमध्येही त्यांचे फक्त नऊ नगरसेवक होते. परंतु, आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपाने धुळय़ात 30 जागांचा टप्पा ओलांडला आहे अनिल गोटे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानं काँग्रेस आघाडीसह, शिवसेनेच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, लोकसंग्राम पक्षाला मतदारांनी साफ नाकारलंय. त्यातून अनिल गोटेंबद्दलची नाराजी दिसते. त्यामुळे त्यांचे बंड भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचे मानले जाते. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मतदारांचा विश्वास, या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाला आहे.