|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » अहमदनगर निवडणूक : शिवारायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार छिंदम विजयी

अहमदनगर निवडणूक : शिवारायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार छिंदम विजयी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. पहिल्या काही फेऱयात पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला

श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधरण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता. या मतदारसंघात चार फेजयांनंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होता. मात्र, नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली. त्याची ही आघाडी तेराव्या फेरीनंतर 1850 मतांपर्यंत पोहोचली आहे. या प्रभागात छिंदमविरोधत अनिता राजेंद्र राठोड (राष्टावादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत.

श्रीपाद छिंदमची पत्नी स्नेहा या प्रभाग 13 (क) मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्याविरोधत निलम गजेंद्र दांगट (राष्ट्रवादी) गायत्री नरेंद्र कुलकर्णी (भाजप), सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होत. येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे.