|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » इंदिरा कँन्टीन मधील खाद्य पदार्थात आळय़ा

इंदिरा कँन्टीन मधील खाद्य पदार्थात आळय़ा 

ऑनलाईन टीम / विजयपूर :

काही दिवसांपूर्वी विजापूर येथे उद्घाटन करण्यात आलेल्या इंदिरा कँन्टीनच्या आहाराचा दर्जा खालवल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये होत आहे. कारण येथील खाद्य पदार्थांमध्ये काही ग्राहकांना आळय़ा आढळून आल्या. राज्य सरकारतर्फे जनतेच्या सेवेकरीता आल्प रूपयात आहार पदार्थ मिळावेत या उद्देशाने राज्यभरात या इंदिरा कँन्टीनची स्थापना करण्यात आली आहे.

पण विजापूर मधील इंदिरा कँन्टीनमध्ये अशा पकारचे दर्जाहिन पदार्थ उपलब्ध होत असल्याकारणाणे येथील खाद्यपदार्थाच्या दर्जांबद्दल शासंकता व्यक्त होत आहे. विजापूर सोलापूर रस्त्यावर असलेल्या या इंदिरा कँन्टीनमधील संबंधीत नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.