|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 49 जागांसह स्पष्ट बहुमत

धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 49 जागांसह स्पष्ट बहुमत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 49 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.

 

भाजपने 49, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने नऊ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने तीन जागांवर खाते उघडले. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधन मानावं लागले. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

 

धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. धुळय़ात काल (रविवारी) 60 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 74 जागा असलेल्या धुळे महापालिकेत बहुमताचा आकडा 38 होता.सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होत. येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे.